top of page

कला आणि कलाकृती | Art & the Artist

Writer's picture: Raginee KRaginee K

आपण काढतो ते पेंटिंग, छायाचित्र, शिल्प, कविता, लिखाण हे कला आहे कि कलाकृती ?

हा प्रश्न मला उगाचच सकाळी सकाळी पडला. वाटले आपल्या सभोवती असलेल्या गोष्टींनी कलाकार प्रभावित होऊन माध्यमाद्वारे व्यक्त होत असतो. त्या गोष्टींचे प्रतिबिंब मनाच्या आरशावर पडल्यावर त्यात तो स्वतःचे रंगभरतो. मग त्या गोष्टींचे उदात्तीकरण आपल्या कार्याद्वारे करतो ज्याला लोक कलाकृती म्हणतात. त्यासाठी वर्षानुवर्षे त्याच्यावर संस्कार झालेले असतात.

Is the painting, photograph, sculpture, poem, writing that we draw are art or a work of art?

This question came to me early in the morning. Artists are influenced by the things around them and express themselves through the available medium.

When the reflection of those things falls on the mirror of the mind, he adds own color to it.

Then we sublimate those things through our works which people call works of art.

For that he undergoes years of training of seeing things.



अज्ञाताला ज्ञात गोष्टींसोबत जोडून आपल्याला काय वाटले ते समाजापर्यंत तो सादर करतो. सम पातळीवरचा प्रेक्षक त्याच्या भावना समजतो तर इतर बरेच वासनेच्या उंबरठ्यावरच अडकतात. ह्या सर्व गोष्टींमागे असते एक तीव्र प्रेरणा त्या अनुभवांना मूर्त रूप देण्याची. परंतु मग पुन्हा प्रश्न तोच कला म्हणजे नेमके काय ?


By connecting the unknown with the known, he presents what he feels to society.

A viewer on the same wavelength understands his feelings while many others are stuck on the threshold of lust. Behind all these things is a strong motivation to embody those experiences.But then again the question is what exactly is an art?

रसरशीत आणि जिवंत निसर्गाच्या तालाबरोबर एकरूप झालेली प्रत्येक गोष्ट कलाकाराला प्रेरित करते. मग तो एखादा पर्वत, वनराई, प्राणी किंवा व्यक्ती असो.त्यांचा तो डौल, लयबद्धता, मोहक हालचाली या खरेतर साक्षात शक्तीचेच प्रकटीकरण असते. तिच्यामध्ये गुरफटले तर माया पण जर चैतन्याची जाणीव झाली तर साक्षात शक्ती स्वरूपाचीच अनुभूती येते. कलाकार हा ते अनुभवातून पाहायला आणि व्यक्त करायला शिकतो. त्यामुळे त्या कलेची आकृती ही कलेचे एक प्रतिबिंबच बनते.





Everything that harmonizes with the rhythm of the lush and living nature inspires the artist.

Be it a mountain, a forest, an animal or a person.Their dynamism, rhythmicity, graceful movements are in fact a manifestation of Shakti.If you get entangled in it then it becomes Maya but if you realize the consciousness behind, then you actually feel the form of Shakti.

An artist learns to see and express it through experiences. Therefore, the figure of that art becomes a reflection of the art itself.

प्रेक्षक कलाकृतीद्वारे सौंदर्य पाहण्यास शिकतो. मूळ सौंदर्य मात्र निसर्ग आणि व्यक्ती यांच्या मार्फत सतत आपला विलास आणि आनंद निर्मिती करीत सर्व माध्यमांच्या पलीकडे सर्वव्यापी राहते. या प्रवासात कधीतरी कलाकार कलेला पूर्णपणे समजून घेतो. पण तेव्हा त्याचा कुंचला, कँमेरा, हातोडी, पेन ही सर्व आयुधे थांबतात. कारण अव्यक्तला पूर्णपणे समजल्यावर ते व्यक्त करायची गरजच संपलेली असते. इथून पुढचा प्रवास मात्र एकाकी असतो.


The viewer learns to see beauty through the artwork. Original beauty, however, remains omnipresent beyond all mediums, constantly expressing with full grandeur and joy through nature and individuals. At some point in this journey the artist fully understands art. But then all his tools such as brush, camera, hammer, pen stop. Because when the unexpressed is fully understood, the need to express it is over. From here onwards the journey is lonely.


Writer & photographer : Yogesh Kardile

Muse : K Raginee Yogesh

All rights reserved.

273 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page