top of page

नितळ सौंदर्य | Ethereal Beauty

Writer's picture: Raginee KRaginee K

सर्वांना हवीहवीशी वाटणारी गोष्ट. काही नाही तरी आपल्या मालकीचे व्हावे हा विचार तर नक्कीच मनात येतो. मग तो दुसऱ्याच्या बागेतील टपोरा गुलाब, दुसऱ्याची मुलगी ( प्रेयसी / पत्नी म्हणून ) किंवा काळीशार जमीन. प्रत्येक नितांत सुंदर गोष्टीचा हव्यास हा मानवजातीला लागलेला शापच जणू.


Everyone aspires to own it. It can be a beautiful rose flower, or a girl next door ( as beloved / wife ) or a vast land. Whatever is beautiful must be owned that the the curse to humanity. It can't be free. Everyone wants to own it for the sake of owning.


इतर काही गोष्टी कधी कधी आपल्या हाती नसतात. परंतु नितळ स्वभाव मात्र आपण नक्कीच जोपासू शकतो. हो त्याला खूप काळजी देखील घ्यावी लागते. परिस्थितीनुसार जसे पाणी गढूळ होते तसे मनावर देखील विचारांचे मळभ येते. एक किंकर्तव्यमूढता येते. लहानपणीचा उत्साह वयानुसार थोडा कमी होतो. समाजातील अन्याय आणि कृतघ्न लोक अनुभवल्याने कधी कटुता येते. पण ज्याला आपण आत्मा म्हणतो तो जर खरोखरीच सत चित्त आनंद स्वरूप असेल तर नितळता का शक्य नाही ? येणारे विचार कधीतरी जाणारच. जर मी त्यांचा मालक नाही तर मग त्यासोबत येणाऱ्या भावना देखील माझ्या नाहीत.

We do not have everything in our hand. But the changing of our nature is definitely yes. A clear conscience can be inculcated. The way river water pollutes when mud overtakes it same way thoughts invade our mind. A kind of indecisiveness comes, the enthusiasm of childhood reduces when age progresses. After experiencing injustice and ungrateful people in life we may turn sour. But what we cal Atman ( soul ) if it is truly bliss then why can't we become truly blissful ? Thoughts that comes will eventually fade away. I am not the owner of them so those emotions are also not mine.



निखळ आरशासारखे प्रतिबिंब जगाला दाखवीत त्याचा डाग मात्र स्वतःला न चिटकविला तर आपल्यासारखे सुंदर आपणच. कोण काय म्हणेल किंवा करेल हे त्याच्या त्याच्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून तो आपली वाट चालेल. आपण मात्र या संसाराच्या खेळात एक खेळाडू म्हणून उत्साहाने भाग घेणे आणि शेवटपर्यंत हा एक खेळच आहे हे लक्षात ठेवले कि प्रत्येक डावात आनंदच सापडेल.


If we become like a mirror showing the true nature to the world without sticking their things on us we will be truly beautiful. What someone is doing or saying is not our business. It's his/ her conscience. We can be a player in this life ; playing our bit with full enthusiasm. If we understood that this is a game then we will play with bliss but nothing else.


Words & photography : K. Yogesh

Model : K. Raginee Yogesh

All rights reserved

408 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page