top of page
Writer's pictureRaginee K

Freebird मुक्ता

 



या गवताळ कुरणावर वाऱ्यासोबत गप्पा गोष्टी करताना मी सर्वकाही विसरून जाते. ऊन, वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यात देखील फुलणारी रानफुले पाहून मला का कुणास ठाऊक स्वतःलाच आरश्यात  पाहिल्यासारखे वाटते. तुझा तो समाज, त्या चालीरीती, ते संस्कार, ती नातीगोती, पद आणि त्यासोबत येणारी प्रतिष्ठा हे सर्व मला अगदी त्यांच्यासारखेच अंगावर येऊन भंडावून सोडतात. आणि कधी कधी तू सुद्धा? का नाही फक्त असणे पुरेसे होत ? का नाही या हृदयीचे त्या हृदयी सूर जुळत ? चौकटीतच जगायचे ठरविल्यावर श्वास कोंडणारच ना ?  



I forget everything when I am on this grassy meadows talking to the wind. For some reason, seeing the wildflowers bloom despite the assault of the sun, wind, and rain makes me feel as if I am looking at myself in a mirror. Your society, those customs, traditions, relationships, the status, and the prestige that comes with it—all of these overwhelm me just like those wildflowers under the pressure of elemental forces. And sometimes, you too.  Why isn't just existing enough? Why can’t the melody of this heart melt the other heart ? If one decides to live within a framework, how can I follow the same one ?




मला मात्र या वाऱ्यासोबत मुक्त वाहायचेय. काही क्षण का होईना एकटे जगायचंय. तो अंगावरून वाहताना त्याचा स्पर्श सुखावतो. नाकाद्वारे हृदयात आणि मग सर्व गात्रांमध्ये वाहत मला जिवंत असल्याची जाणीव करून देतो. तो नाही भेद करीत मी आणि त्या रानफ़ुलांमध्ये. मला काही काळ तरी इथेच राहायचे. अलगदपणे तुझ्यापासून वेगळे व्हायचे जसे प्राजक्ताचे फुल झाडावरून गळून जमिनीवर त्याचा सडा पडतो तसे. नकोय तो संघर्ष. थकवा आलाय त्या साऱ्या ओढाताणीचा. मनातून मी कधीच तुटलीय रे सगळ्यांपासून. फक्त हे शरीर आहे तुला हक्क गाजवायला. 



But I want to flow freely with this wind. Even if just for a few moments, I want to live alone. When the wind blows over me, its touch brings me comfort. Flowing through my nose to my heart and then throughout my body, it makes me feel alive. It doesn’t differentiate between me and those wildflowers.I want to gently separate myself from everyone, like the night-flowering jasmine that gracefully falls  on the ground. I’m tired of all that push and pull. Emotionally, I’ve already detached myself from everything. It’s just this body that remains for you to claim.



मी नाही कोणी तत्वज्ञानी जो घर सोडून पळून जाईल आणि मग साऱ्या जगाला संसार कसा करायचा सांगायला पुन्हा एक नवा संसार उभा करेल. कधीतरी मग मी परत येईल तुझ्याकडे. अर्थातच तुझ्यात तेवढा संयम असला तर. मला मीपण अनुभवायचेय. सगळ्या जबाबदाऱ्यांतून थोडा वेळ मुक्त होऊन सगळ्यांच्या नजरांपासून दूर जिवंत असणे अनुभवत फक्त मुक्त श्वास घ्यायचा. जिथे नाही कोणाच्या टोचणाऱ्या नजरा, अपेक्षा आणि नीति नियम.  मी फक्त थोडा वेळ मागतेय माझे मला उमगायला. 



I am not some philosopher who will leave home only to come back to preach the world by creating a new version of samsara . Someday, I will return to you. Of course, you have to have the patience. I want to experience myself ; to feel alive and simply breathe freely. Where there are no prying eyes, no expectations, and no rules or regulations. I’m just asking for a little time to understand myself.




Words & Photography : Yogesh Kardile

Muse : K Raginee Yogesh

All rights reserved.

149 views0 comments

Recent Posts

See All

Comments


bottom of page