मनावरती गारुड करणारी ती फक्त तिच्या नजरेने बंदिस्त करते. कोणी तिला चेटकीण किंवा स्वैर म्हणते तर कोणी स्वछंदी स्त्री. आचार आणि विचारांनी मुक्त अशी ती ना कोणाला जुमानते ना हाती येते. आत्ता आत्ता पर्यंत कळली अशी वाटेपर्यंत निसटून जाते. प्रत्येकाला आपल्या मनाच्या निबिड अरण्यात कधीतरी ती भेटतेच. एखादा मुग्ध होत तिला समरसतेने भिडतो तर एखादा तिच्या शक्तीपुढे क्षीण होऊन पळवाट काढतो नाहीतर तिला संपविण्यात सामील होतो किंवा शेवटपर्यंत आयुष्य एक व्यवहार म्हणून जगतो.
तिला भिडणाऱ्याची मात्र ती पावला पावलावर परीक्षा घेते. पण त्याच्या सोबतच खूप काही देऊन जाते. नागासारखी सळसळणारी , तेजस्वी आणि तितकीच शक्ती असलेली एक उस्फुर्त विद्युल्लता . आयुष्याच्या अंधारलेल्या दिशाहीन पटलावर चमकणारी ऊर्जा. ओळ्खले तर स्वतःचीच एक बाजू नाहीतर कोणीच नाही.
Comments