माटी कहे कुम्हार से, तु क्या रोंदे मोय। एक दिन ऐसा आएगा, मैं रौदूंगी तोय।।
कबीर वाणीतील हे अनमोल शब्द मनाला जेव्हा अहंकार घट्ट पकडतो तेव्हा आपल्यास शांत करण्यास कामी येतात. हे सुंदर शरीर, पद, पैसा किंवा प्रतिष्ठा आपल्याला हवेच आहे. परंतु ते नश्वर आहे हे देखील ही पंचमहाभूतातील एक पृथ्वी आपल्याला प्रत्येक क्षणी सांगते. या मातीतूनच निर्माण झालेला हा पुतळा कितीही सुंदर वाटला तरीही तो तिच्यातच विरघळुन नवा पुतळा बनणार आहेच.

These precious words of Kabir Vani help to calm the mind when the ego grips it tightly. We must want this beautiful body, position, money or prestige. But that it is also mortal, this one of the Panchamahabhutas ( Earth) tells us every moment. No matter how beautiful this statue created from this soil seems, it will dissolve in it and become a new statue.

या घटात आज आपले पंचप्राण आहेत उद्या दुसऱ्याचे असतील. उसना घेतलेला हा देह जिच्यातून आला तीच तो परत देखील घेणार. मग अहंकार कशाचा ? नश्वर म्हणून नाकारले तर घृणा उत्पन्न होते. तो देखील एक अहंकारच. मोहापायी चिकटून बसले तर कधीतरी ती तिचा उसना ठेवा परत घेणारच. अशावेळी तिच्या सौदर्याचे गायन, नर्तन करीत तिच्यावरच विश्वास टाकून प्रत्येक दिवस साजरा केला तर न गुंतता हा प्रवास सुखकर होणार.

Today our Panch Pranas ( life forces ) are in this pot ( body ), tomorrow there will be someone else's. This body that has been borrowed will also be taken back by the same earth from which it came. Then why to flaunt the ego ? If we rejected body as a mortal thing then it will produces disgust. That is also another form of an ego. If we clings to it due to attachment, still she will eventually take it back. In that case, if you celebrate every day by singing and dancing in praise of her ( earth ) blessings and trusting her, this journey will be pleasant without getting involved.

मातीतलं चैतन्य त्वचा, अस्थी आणि रक्त या रूपात सळसळते. तसेच ते दुसऱ्या देहात देखील कमीअधिक प्रमाणात खेळते. मग त्याच्यातील आणि आपल्यातील चैतन्य वेगळे ते कसे ? जिच्यावर आपण चालतो, जिच्यातून उत्पन्न झालेले अन्न आपण खातो आणि तिच्यावरच निद्रिस्त होतो. ती आणि आपण वेगळे कसे ? या विश्वात यापेक्षा मोठा चमत्कार अजून दुसरा तो कोणता ? तेव्हा कबीरांचे शब्द पुन्हा आठवतात.

The spirit in the soil manifests itself in the form of skin, bones and blood. Also it plays more or less same in other bodies as well. Then how is the consciousness between him and us different? On which we walk, eat the food produced by her and sleep on it. How do you and she differ ? What is the biggest miracle other than this in the world ? Then Kabir's words are again comes to my lips.
सकल हंस में राम विराजे, राम बिना कोई धाम नहीं
हर घट में है जोत है वासा, राम को सुमिरों ने दूजा नहीं ||

Words & Photography : Yogesh Kardile
Muse : K Raginee Yogesh
All rights reserved.
コメント